इंग्लिश बोलण्याबद्दल थोडंस…

इंग्लिश बोलण्याबद्दल थोडंस….

खरं सांगायचं तर सुरुवातीला माझ्याकडून हा ब्लॉग काढण्यासाठी झालेल्या दिरंगाईबद्दल क्षमस्व…

मी हा ब्लॉग काढला आहे याचे कारण एकच आहे की जर माझ्यासारखा मराठी माध्यमातून शिकलेला..इंग्लिश वातावरण न लाभलेला मुलगा जर इंग्लिश बोलू शकतो तर कोणीही ही भाषा सहज शिकू शकतो…

माझा हा ब्लॉग सुरु करण्याचा एकच उद्देश आहे की सर्वांनी या ब्लॉग वरील क्लुप्त्या फक्त समजून घेतल्या तरी माझी खात्री आहे की प्रत्येक जण याच्या मदतीने एक दिवस स्वतःही अशा पद्धतीका ब्लॉग काढू शकेल…

मी आपल्या मदतीसाठी आणि गोंधळ न होण्यासाठी या ब्लॉगचे तीन भाग केले आहेत ज्याला आपण लेव्हल्स असे म्हणू शकता…

#पहिला भाग..

   मी पहिल्या भागात यापद्धतीने सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे की जी व्यक्ती या आधी कधीही इंग्लिशशी तीचा संबंध नाही आलेला पण त्यांची इच्छा आहे की त्यानी इंग्लिश न अडखळता बोलायला हवं तर त्यांनी या भागावर एकदा नजर टाकावी…तशी हि लेव्हल अजिबात अवघड नाहीये… पण प्रत्येकाने यावर एकदा नजर टाकावी आणि हे पुन्हा एकदा समजून घ्यावे…

 

#दुसरा भाग…या भागात मी ज्याला इंग्लिश बोलता येत पण त्याला अजूनही यातल्या व्याकरणावद्दल अजूनही आत्मविश्वास नाहीये कि आपण बोललेलं वाक्य हे व्याकरणाला धरून आहे की नाही..या अशा सर्वांसाठी ही लेव्हल मी ठेवली आहे…

 

#तिसरा भाग…हा भाग मी जे लोक मुलाखतीला थोडे घाबरून असतात ज्यांच्या पहिल्या दोन लेव्हल्स पूर्ण झालेल्या असतात अशा सर्वांसाठी आहे…या भागात मी स्वतः मुलाखतीला जे काही प्रश्न येतात त्यांचं एकत्रिकरण केलेलं आहे…जे सर्वांना उपयोगी पडेल याची मला खात्री आहे…

 

ही वेब तुमच्या सोबत आयुष्यभर राहील..

याचं पाहिलं कारण असे आहे की या वेब वर तुम्ही पूर्ण अभ्यास करून ज्या काही तुमच्या सूचना असतील तुमच्याकडून आलेल्या सर्व प्रतिसादांचा मागोवा निश्चित घेतला जाईल.. .

 

#ई-मेल सेवातुम्ही इंग्लिश संबंधित कोणत्याही अडचणी असतील जसे की तुम्हाला एखादे भाषण द्यायचे असेल…तुमच्या मुलाखतीसाठी तुम्हाला कोणती मदत हवी असेल किंवा तुम्हाला एखादे वाक्य इंग्लिश मध्ये कसे असावे यासंदर्भात काही माहिती हवी असल्यास तुम्ही makemyenglish@gmail.com या सांकेतिक पत्त्यावर आपल्या अडचणी पाठवू शकता…आणि माझा शब्द आहे की प्रत्येक अडचण सोडविली जाईल आणि प्रत्येक इमेल ला रिप्लाय दिला जाईल आणि प्रत्येक शंकेचे निरसन केलं जाईल…

 

# SMS सेवाया सेवेवर तुम्हाला कधीही कुठेही एखादा शब्द आठवत नसेल किंवा एखादे वाक्य इंग्लिश मध्ये आठवत नसेल तर त्या व्यक्तीला फक्त जो काही शब्द हवा असेल तो पाठवू शकतात आणि जरी कोणत

या क्रमांकावर फक्त आपली अडचण पाठवून द्यावी लागेल मेसेज द्वारे…

*हा नंबर पूर्णपणे फक्त हेल्पलाईन म्हणून वापरला जाईल आणि या नंबर वर आलेले मेसेजेस व त्यांचे नंबर्स कुठेही लीक केले जाणार नाहीत याची पूर्ण खबरदारी www.makemyenglish.wordpress.com या संकेतस्थळाच्या व्यवस्थापनाकडून घेतली जाईल…

या वेब वर तुम्ही जर याला फॉलो केल्यास तुम्हाला याचे नेहमी अपडेट्स मिळत राहतील जसे की ब्लॉग्स किंवा स्पीचेस किंवा प्रोत्साहनपर वाक्ये असतील किंवा इंग्लिश बोलण्या संबंधित जे काही साहित्य असेल ते तुम्हाला mail केले जातील…